गोष्टी ऐकायला कोणाला आवडत नाही? भाषेचा शोध लागल्यानंतर मनोरंजनासाठी सुरुवात झालेल्या कथाकथनाच्या प्रकारामुळे माणसात गोष्टी चवीने सांगणारे आणि रसिकतेने ऐकणारे असे दोन विभाग पडले. मनोरंजनाच्या या मूलभूत गरजेची मानवाबरोबरच कालानुरूप उत्क्रांती होत गेली आणि आजच्या प्रगत सिनेसृष्टीत त्याचे रुपांतर झाले. जगाला एकत्र आणणाऱ्या काही निवडक प्रसारमाध्यमांपैकी हे सर्वात मनोरंजक माध्यम. आणि त्यातही आपली भारतीय सिनेसृष्टी म्हणजेच बॉलिवूड सर्वोत्तम.
जवळपास १००० च्या घरात आपल्याकडे सिनेमे बनतात. सिनेमाची सुरुवात आणि प्रवास कठीण काळातून झाल्यामुळे आपल्या विकसनशील देशात विरंगुळा म्हणूनच सिनेमाकडे पहिले गेले आणि आजची पाहिले जाते. त्यामुळे मसाला सिनेमांना इथे नेहमीच यश आले आणि येत आहे. मारधाड, विनोद, प्रेमकथा, नाट्य (म्हणजे ड्रामाबाजी बर का..) अशा उत्कट भावनांना ठळकपणे दाखवणारे इथे यशस्वी झाले. आपल्या सारखी गाणी तर जगात इतरत्र कुठल्याच देशातील सिनेमात दाखवली जात नाहीत. विविधतेने नटलेल्या भारतात सिनेनिर्माते आणि सिनेरसिक यांच्यातही बरीच विविधता आढळते आणि ती सिनेसृष्टीच्या विकासाला पोषकच ठरली. आज आपला सिनेमा जगभरात प्रदर्शित होऊ लागल्याने त्याची दखल पूर्ण जगाने घेतलीये.
पूर्ण जगात सिनेमे प्रदर्शित करण्याची ताकद ठेवणारी सिनेसृष्टी म्हणजे हॉलीवूड. पण तीदेखील वर्षाला जवळपास फक्त ४०० सिनेमे करत असून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तांत्रिक बाबीत सर्वोत्तम आणि जगातील सर्वोत्कृष्ट प्रतिभा खेचून घेण्याच्या क्षमतेमुळे हॉलीवूड जवळपास २३ वेगवेगळ्या प्रकारात मोडणारे सिनेमे प्रदर्शित करते ज्यात डॉक्युमेंटरी, साय-फाय, काल्पनिक असे क्वचितच आपल्याकडे पाहायला मिळणारे प्रकारही आहेत. भारतीय सिनेबाजारपेठ चांगलीच कळल्यामुळे की काय मागील काही वर्षात आपल्याकडे येणारे त्याचे सिनेमे खूप वाढलेत. आणि आपल्या प्रेक्षकांनीही हे स्वीकारल्यामुळे हल्ली काही हॉलीवूड सिनेमे पूर्ण जगातील उत्पन्नाच्या १५ ते २० टक्के उत्पन्न एकटे भारतातून करू लागले आहेत.
प्रसारमाध्यमे वेड्यासारखी प्रगत होत चालली आहेत. जगात कोणीही कोणाशीही संपर्क करू शकतो. त्यामुळे जागतिक सिनेमा आपल्या दाराशी येऊन ठेपला आहे. माजघरात आजी रामायण पाहता पाहता देवाची आळवणी करत असताना आपल्या खोलीत नातू स्पायडरमॅन पाहताना जगातील सर्वोत्तम एनिमेटर होण्याची स्वप्ने पाहत आहे. जगाला जबरदस्त गतीने बदलणारी ही प्रसारमाध्यमे म्हणजे आजच्या जागतिक विकासाचा आरसा आहेत आणि आपल्याकडे या आरश्याचा फार मोठा भाग हा आपल्या सिनेसृष्टीने बनला आहे. भारतीय संस्कृतीवर तगडा प्रभाव असलेली आपली सिनेसृष्टी क्षणोक्षणी बदलत आहे आणि तरीही त्याची गती जागतिक माध्यम बदलाच्या गतीइतकी आहे असे बोलणे नजीकच्या काळात चुकीचे ठरेल इतकी प्रसार माध्यमे वेगाने बदलत आहेत.
आजच्या युगात झालेली संपर्कक्रांती नजीकच्या भविष्यात जग अधिकाधिक छोटे करून सोडणार आहे. तेव्हा आपली सिनेसृष्टी सर्वात मोठी असून फायदा नाही. कारण तेव्हा जो मोठा किंवा पहिला किंवा जास्त नाविन्यपूर्ण आहे तोच विजेता ही कल्पना जुनी होईल. मोठाल्या कंपन्यांना मागे टाकणारी फेसबुक वेबसाईटचेच उदाहरण घ्या की. जो जगाची गती ओळखून तिला जुळवून प्रगती करेल तोच विजेता होणार आणि राहणार. त्यामुळे लवकरच आपल्या सिनेसृष्टीला आणि आपल्याला मोठ्या सिनेसांस्कृतिक बदलला अधिक वेगाने सामोरे जावे लागणार आहे. तेव्हा त्या बदलला तोंड द्यायचे आहे तर आपल्याला जागतिक सिनेमाचे सार्वत्रिक ग्ञान हवे तर आपल्याला आणि पर्यायाने आपल्या सिनेसृष्टीला योग्य त्या गतीने बदलणे सोपे जाईल.
वर थोडक्यात सगळी कल्पना देण्याच्या नादात मी खूप गंभीरपणे ओवरडोस् दिलाय हे खरे. पण सांगण्याचा मुद्दा हाच की माझ्या जागतिक सिनेमांच्या वेडामुळे आणि मागील काही वर्षातील प्रसार माध्यमांवरील झालेल्या अभ्यासामुळे ज्या काही गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या त्याच्यावर पुष्कळ विचार केल्यावर हे जाणवले की आपल्यावर प्रत्येक क्षणी होणाऱ्या हा सिनेसृष्टीचा प्रभाव जर अभ्यासपूर्वक पहिला तर त्याचा आपल्यालाच प्रचंड फायदा होईल. एखादा उत्कृष्ट सिनेमा दीड तासात सही टाईमपास करतो असे आपण जरी बोलत असलो तरी त्यातील अभ्यासपूर्वक काम करणाऱ्या कलाकारांच्या मेहनतीमुळे आपल्याला जे ग्ञान मिळते ते कित्येक पुस्तकांपेक्षा जास्त प्रभावी असते. असे सिनेमे पाहून त्यासंबंधित रुची निर्माण करून आपण आपल्याकडील अस्सल आणि नव्या दमाच्या सिनेनिर्मात्यांना चांगले सिनेमे बनवण्यासाठी प्रोत्साहनच देऊ जे आपली सिनेसृष्टी जागतिक दर्जाची आणि तरीही अस्सल ठेवण्यास झटत आहेत.
परत वाहवत गेलो बघा..आता हा विषयच असा आहे माझ्यासाठी की...जाऊ द्या..थोडक्यातच सांगतो. या ब्लॉगमध्ये सिनेमाविषयी चर्चा होणार. मागील ७-८ वर्षे जवळपास रोज सिनेमा पहिल्याने मिळालेले ग्ञान आपल्या मराठी जनांना हिस्स्याहिस्स्याने देणार. ते कसे? तर माझ्या पोस्टमार्फत. यात मला सिनेमाबद्दल ज्या ज्या भन्नाट गोष्टी कळतील अशा गोष्टी तसेच माझी हलकी पुलकी समीक्षणे अस बरच काही मी इथे शेअर करणार. तसेच काही मराठी बांधव असतील ज्यांचे सिनेमाचे ग्ञान अफलातून असेल अशा बांधवांना इथे मला कमेंट्सच्या मार्फत भेटता येणार. इंटरनेटच्या या सर्वात गतीवान प्रसारमाध्यमाचा उपयोग आपण आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव असणाऱ्या माध्यमाच्या माहितीसाठी करणार..
आजचा सिनेमा हा जागतिक बदलाचा आरसा आहे. या आरशात जगाचे प्रतिबिंब पाहायला मिळते. त्यात स्वतःचे स्थान ओळखून आपण थेट जगाशीच तुलना करणार. जास्त झाले?...
अहो जगातील सर्वात मोठी सिनेसृष्टी आपली. तिचा फायदा करून घेणे आणि त्यासाठी सिनेसृष्टीची ढोबळ माहिती ठेवणे हे तर आपले परम कर्तव्यच आहे. आणि असे कर्तव्य बजावायला मला तर बाबा जाम आवडते. तुम्हांलाही आवडेल. म्हणूनच मी या सिनेकट्ट्यावर येऊन आपले सिनेमाचे असेल नसेल ते सर्व ग्ञान तुम्हा सिनेकट्टेकर्यांसमोर पाजळणार.
तर मग...कशी वाटली ही कल्पना? या नवीन कट्ट्यावर नेहमी यायला तुम्हाला आवडेल ना? मेम्बरशिप फ्री आहे बर का.. ;)
जवळपास १००० च्या घरात आपल्याकडे सिनेमे बनतात. सिनेमाची सुरुवात आणि प्रवास कठीण काळातून झाल्यामुळे आपल्या विकसनशील देशात विरंगुळा म्हणूनच सिनेमाकडे पहिले गेले आणि आजची पाहिले जाते. त्यामुळे मसाला सिनेमांना इथे नेहमीच यश आले आणि येत आहे. मारधाड, विनोद, प्रेमकथा, नाट्य (म्हणजे ड्रामाबाजी बर का..) अशा उत्कट भावनांना ठळकपणे दाखवणारे इथे यशस्वी झाले. आपल्या सारखी गाणी तर जगात इतरत्र कुठल्याच देशातील सिनेमात दाखवली जात नाहीत. विविधतेने नटलेल्या भारतात सिनेनिर्माते आणि सिनेरसिक यांच्यातही बरीच विविधता आढळते आणि ती सिनेसृष्टीच्या विकासाला पोषकच ठरली. आज आपला सिनेमा जगभरात प्रदर्शित होऊ लागल्याने त्याची दखल पूर्ण जगाने घेतलीये.
पूर्ण जगात सिनेमे प्रदर्शित करण्याची ताकद ठेवणारी सिनेसृष्टी म्हणजे हॉलीवूड. पण तीदेखील वर्षाला जवळपास फक्त ४०० सिनेमे करत असून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तांत्रिक बाबीत सर्वोत्तम आणि जगातील सर्वोत्कृष्ट प्रतिभा खेचून घेण्याच्या क्षमतेमुळे हॉलीवूड जवळपास २३ वेगवेगळ्या प्रकारात मोडणारे सिनेमे प्रदर्शित करते ज्यात डॉक्युमेंटरी, साय-फाय, काल्पनिक असे क्वचितच आपल्याकडे पाहायला मिळणारे प्रकारही आहेत. भारतीय सिनेबाजारपेठ चांगलीच कळल्यामुळे की काय मागील काही वर्षात आपल्याकडे येणारे त्याचे सिनेमे खूप वाढलेत. आणि आपल्या प्रेक्षकांनीही हे स्वीकारल्यामुळे हल्ली काही हॉलीवूड सिनेमे पूर्ण जगातील उत्पन्नाच्या १५ ते २० टक्के उत्पन्न एकटे भारतातून करू लागले आहेत.
आजच्या युगात झालेली संपर्कक्रांती नजीकच्या भविष्यात जग अधिकाधिक छोटे करून सोडणार आहे. तेव्हा आपली सिनेसृष्टी सर्वात मोठी असून फायदा नाही. कारण तेव्हा जो मोठा किंवा पहिला किंवा जास्त नाविन्यपूर्ण आहे तोच विजेता ही कल्पना जुनी होईल. मोठाल्या कंपन्यांना मागे टाकणारी फेसबुक वेबसाईटचेच उदाहरण घ्या की. जो जगाची गती ओळखून तिला जुळवून प्रगती करेल तोच विजेता होणार आणि राहणार. त्यामुळे लवकरच आपल्या सिनेसृष्टीला आणि आपल्याला मोठ्या सिनेसांस्कृतिक बदलला अधिक वेगाने सामोरे जावे लागणार आहे. तेव्हा त्या बदलला तोंड द्यायचे आहे तर आपल्याला जागतिक सिनेमाचे सार्वत्रिक ग्ञान हवे तर आपल्याला आणि पर्यायाने आपल्या सिनेसृष्टीला योग्य त्या गतीने बदलणे सोपे जाईल.
वर थोडक्यात सगळी कल्पना देण्याच्या नादात मी खूप गंभीरपणे ओवरडोस् दिलाय हे खरे. पण सांगण्याचा मुद्दा हाच की माझ्या जागतिक सिनेमांच्या वेडामुळे आणि मागील काही वर्षातील प्रसार माध्यमांवरील झालेल्या अभ्यासामुळे ज्या काही गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या त्याच्यावर पुष्कळ विचार केल्यावर हे जाणवले की आपल्यावर प्रत्येक क्षणी होणाऱ्या हा सिनेसृष्टीचा प्रभाव जर अभ्यासपूर्वक पहिला तर त्याचा आपल्यालाच प्रचंड फायदा होईल. एखादा उत्कृष्ट सिनेमा दीड तासात सही टाईमपास करतो असे आपण जरी बोलत असलो तरी त्यातील अभ्यासपूर्वक काम करणाऱ्या कलाकारांच्या मेहनतीमुळे आपल्याला जे ग्ञान मिळते ते कित्येक पुस्तकांपेक्षा जास्त प्रभावी असते. असे सिनेमे पाहून त्यासंबंधित रुची निर्माण करून आपण आपल्याकडील अस्सल आणि नव्या दमाच्या सिनेनिर्मात्यांना चांगले सिनेमे बनवण्यासाठी प्रोत्साहनच देऊ जे आपली सिनेसृष्टी जागतिक दर्जाची आणि तरीही अस्सल ठेवण्यास झटत आहेत.
परत वाहवत गेलो बघा..आता हा विषयच असा आहे माझ्यासाठी की...जाऊ द्या..थोडक्यातच सांगतो. या ब्लॉगमध्ये सिनेमाविषयी चर्चा होणार. मागील ७-८ वर्षे जवळपास रोज सिनेमा पहिल्याने मिळालेले ग्ञान आपल्या मराठी जनांना हिस्स्याहिस्स्याने देणार. ते कसे? तर माझ्या पोस्टमार्फत. यात मला सिनेमाबद्दल ज्या ज्या भन्नाट गोष्टी कळतील अशा गोष्टी तसेच माझी हलकी पुलकी समीक्षणे अस बरच काही मी इथे शेअर करणार. तसेच काही मराठी बांधव असतील ज्यांचे सिनेमाचे ग्ञान अफलातून असेल अशा बांधवांना इथे मला कमेंट्सच्या मार्फत भेटता येणार. इंटरनेटच्या या सर्वात गतीवान प्रसारमाध्यमाचा उपयोग आपण आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव असणाऱ्या माध्यमाच्या माहितीसाठी करणार..
आजचा सिनेमा हा जागतिक बदलाचा आरसा आहे. या आरशात जगाचे प्रतिबिंब पाहायला मिळते. त्यात स्वतःचे स्थान ओळखून आपण थेट जगाशीच तुलना करणार. जास्त झाले?...
अहो जगातील सर्वात मोठी सिनेसृष्टी आपली. तिचा फायदा करून घेणे आणि त्यासाठी सिनेसृष्टीची ढोबळ माहिती ठेवणे हे तर आपले परम कर्तव्यच आहे. आणि असे कर्तव्य बजावायला मला तर बाबा जाम आवडते. तुम्हांलाही आवडेल. म्हणूनच मी या सिनेकट्ट्यावर येऊन आपले सिनेमाचे असेल नसेल ते सर्व ग्ञान तुम्हा सिनेकट्टेकर्यांसमोर पाजळणार.
तर मग...कशी वाटली ही कल्पना? या नवीन कट्ट्यावर नेहमी यायला तुम्हाला आवडेल ना? मेम्बरशिप फ्री आहे बर का.. ;)






gr8 blog!!
ReplyDeleteegerly waitin for your next post! :)
thanks buddy..coming very soon..
Delete